Episodit
-
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिवर्षाची सांगता 4 फेब्रुवारी 2020 रोजी होते आहे. 4 फेब्रुवारी 1922 ते 24 फेब्रुवारी 2011 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भीमसेनजींनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एक मोठा काळ गाजवला आहे. सवाई गंधर्वांकडून किराणा घराण्याची तालीम त्यांनी घेतली, मात्र स्वतःला भावलेल्या इतरही अनेक ज्येष्ठ गायकांच्या संगीतातील गुणवैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली आणि स्वतंत्र शैली घडवली. ख्यालासह ठुमरी, अभंग, नाट्यपदे, सिनेगीते अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली आहे. 'साधना'चे भूतपूर्व संपादक, कवी वसंत बापट हे भीमसेनजींच्या निकटवर्तीयांपैकी. भीमसेनजींच्या 'अभंगवाणी' या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी वसंत बापट अनेकदा निरुपण करत असत.
भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 2003 च्या दिवाळी अंकातील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी' हा लेख ऑडिओ स्वरूपात पुन्हा भेटीला आणतो आहोत. साहित्य-संगीताचे मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी यांचा हा लेख, त्यांच्या आणि भीमसेनजींच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत भीमसेनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनवट पैलू उलगडणारा आहे. 50 मिनिटांच्या या ऑडिओसाठी सुहास पाटील यांनी अभिवाचन केले आहे.
साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवरील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा :
अमृताचे डोहीं अमृततरंग - वसंत बापट
भारतीय संगीताचा मानदंड : पंडित भीमसेन जोशी - श्रीराम पुजारी
बहुजनगायक - विनय हर्डीकर -
On the occasion of National Youth Day, Kartavya Sadhana is publishing an audio series titled- “In Conversation with.....” The series is comprised of three interviews of individuals working in their field for a long time. Their lives, work, and their life choices have a lot to inspire, inspire youth, young people of society.
In this insightful conversation with Kavitha Kuruganti, we tried to understand her life journey, her area of work i.e. agriculture. Kavitha witnessed an entire farmer protest at the Singhu border. We touched upon contemporary issues of farmers. How she looks at agriculture and youth! Kavitha is a food activist, a Founder Convener of the Alliance for Sustainable & Holistic Agriculture (ASHA) which played a huge role in ripping off the Pepsico rights over the FC5 potato variety. She has dedicated her life to ensure sustainable farm livelihoods and farmers' rights.
National Youth Day is commemorated in the honor of a great philosopher and monk Swami Vivekananda. In 1985, the Government of India declared Swami Vivekananda's birthday – January 12 - National Youth Day. The day is marked to celebrate his life and teachings that have encouraged millions across the world. On the backdrop of National Youth Day, we are publishing comprehensive interviews of people who can be an inspiration for youth.
- - - - - - - - - - - -
Follow / Subscribe us on:
Website - www.kartavyasadhana.in/
Facebbok - www.facebook.com/kartavyasadhana1/
Instagram - www.instagram.com/kartavya_sadhana/
Telegram Channel - https://t.me/kartavyasadhana
-
Puuttuva jakso?
-
On the occasion of National Youth Day, Kartavya Sadhana is publishing a audio series titled “In Conversation with.....”
The series is comprised of three interviews - Priyanka Mohite (Sports), Deepa Pawar (Social) and Kavita Kuruganti (Agriculture). They are working in their field for a long time. Their lives, work, and their life choices have a lot to inspire young people of society.
In this freewheeling conversation with young mountaineer Priyanka Mohite, we tried to understand her professional journey, her mountaineering career.
-
1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 'लढे अंधश्रद्धेचे' या पुस्तकातून मांडली. 2018 मध्ये साधना प्रकाशनाकडून या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. हे पुस्तक आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel.com) आले असून त्याचे वाचन केले आहे हर्षल लवंगारे यांनी. या पुस्तकातील 'निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ' हे एक प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. या पुस्तकातील इतर प्रकरणे स्टोरीटेलवर ऐकता येतील, त्यासाठी स्टोरीटेलचे subscriptions आवश्यक आहे.
- - - - - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/
-
कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल?
आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे?
- - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/
www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg
Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana
-
कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? | How to look at Israel-Palestine Conflict
आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे?
- - - - - - - - -Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/
www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg
Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana
-
मराठी वाचकांच्या तीन पिढ्यांना रहस्यकथांनी भुरळ घालणारे विक्रमी रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर (1907/1909 - 1996) यांचा आज (4 जुलै) 25 वा स्मृतिदिन. 1200 हुन अधिक रहस्यकथा लिहिणारे अर्नाळकर आणि त्यांच्या रहस्यकथा यांच्याविषयी सांगताहेत लेखक- दिग्दर्शक निखिलेश चित्रे...
-
28 जून 1921 ते 23 डिसेंबर 2004 असे 83 वर्षांचे आयुष्य लाभले त्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 3 जुलै 2021 च्या अंकातील विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले संपादकीय त्यांच्याच आवाजात.
-
'स्वतःच्या देशाच्या नागरिकांविरुद्ध शासनपुरस्कृत असहिष्णुतेमुळे संपूर्ण राष्ट्र लयाला जाते; असा मोठा आणि स्पष्ट इतिहास आहे. उलटपक्षी, सहिष्णू शासनामुळे राष्ट्र भक्कम बनते असाही इतिहास आहे. या इतिहासाचे आकलन करून स्मरण करणे, त्यापासून धडा शिकणे राष्ट्ररक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी काळानुसार क्रमवारी लावलेली ही सात महत्त्वाची उदाहरणे थोडक्यात समजून घेऊ.'
आनंद करंदीकर यांनी विविध नियतकालिकांत लिहिलेल्या व काही अप्रसिद्ध अशा एकूण 30 लेखांचा संग्रह 'वैचारिक घुसळण' या नावाने पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे. राजकीय, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा करंदीकर आणि परिशिष्ट अशा सहा विभागात मिळून 30 लेख आहेत. या सर्व लेखांचे स्वरूप ललित-वैचारिक आहे. यातील 'असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे' या लेखाचे वाचन केले आहे समीर शेख यांनी.
-
SHOW LESS1918 ते 1921 अशी तीन वर्षे भारतात व जगभरात 'स्पॅनिश फ्लू'ची साथ आली होती. त्या साथीत सर्वाधिक जीवितहानी भारताची झाली होती. किती लोक मृत्युमुखी पडले याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. पण ते आकडे सव्वा कोटी ते दोन कोटी या दरम्यान असतात. त्यावेळी भारताची लोकसंख्या 25 कोटी होती. म्हणजे त्या साथीत किमान पाच टक्के माणसे मृत्युमुखी पडली. परिणामी 1921च्या जणगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती, ती 1911 पेक्षा काही लाखांनी कमी भरली. असा प्रकार गेल्या शतकात एकदाच झाला आहे. तर त्या साथीचे वर्णन साने गुरुजींनी त्यांच्या 'श्यामचा जीवनविकास' या 1938 मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील एका प्रकरणात केले आहे. सुहास पाटील यांनी या प्रकरणाचे केलेले अभिवाचन ऑडिओ स्वरुपात इथे प्रसिद्ध करत आहोत. शंभर वर्षांत काय बदलले व काय नाही याचा विचार वाचकांना करता यावा यासाठी...
-
कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास (भाग १) | The History of Israel-Palestine Conflict (Part 1)
आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे यावेळी जगातील कानाकोपऱ्यातून लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी तीन भागांची पॉडकास्ट मालिका कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. या पहिल्या भागात, प्रा. अहिरे उलगडून दाखवत आहेत - इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास.
- - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/
www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg
Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana -
कर्तव्य पॉडकास्ट 05 -
67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अक्षय इंडीकर दिग्दर्शित 'त्रिज्या' या चित्रपटला उत्कृष्ट ध्वनीसंयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने 'त्रिज्या'चे ध्वनी संयोजक मंदार कमलापूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे सुहास पाटील यांनी...
-
67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 'खिसा' या लघुपटाने नॉन फिचर फिल्म या विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार पटकावला. खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर हा लघुपट भाष्य करतो. एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी कथा त्यात तरलपणे मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने या लघुपटाचे लेखक आणि कलाकार कैलास वाघमारे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधवी वागेश्वरी यांनी...
-
आबा गोविंदा महाजन हे खानदेशातील प्रथितयश प्रयोगशील बालसाहित्यिक व शिक्षक (आत्ताचे तहसीलदार, शिरपूर, जि. धुळे) यांना 2020 या वर्षासाठीचा अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यातील पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहासाठी हा पुरस्कार आहे. तो जाहीर होताच वाङ्मयक्षेत्रातून त्याचे प्रचंड स्वागत झाले. आबांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो...
- अशोक कौतिक कोळी
साप्ताहिक साधनाच्या 27 मार्च 2021 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख ऑडिओ स्वरुपात. या लेखाचं वाचन केलं आहे सुहास पाटील यांनी.
-
उणेपुरे 44 वर्षांचे आयुष्य लाभलेले कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. मुस्लीम समाजसुधारणांसाठी संघर्ष व प्रबोधन करणाऱ्या मंडळाने गेल्यावर्षी म्हणजे 22 मार्च 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी विनोद शिरसाठ यांनी संवाद साधला होता. मात्र ही मुलाखत झाल्यानंतर दोनच दिवसांनी लॉकडाऊन कालखंड सुरु झाला. त्यामुळे मंडळाचा सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. परिणामी मुलाखतीचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला नव्हता. काल, म्हणजे 22 मार्च 2021 मंडळाने 51 वर्षे पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर हा दीर्घ संवाद प्रसिद्ध करत आहोत. या संवादातून मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वाटचालीचा मागोवा, वर्तमानाचा आढावा आणि भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. व्हिडिओ एडिटिंग सुहास पाटील यांनी केले आहे.
-
आज 20 मार्च, जागतिक कथाकथन दिवस. या निमित्ताने हमीद दलवाई यांची ‘ब्राह्मणांचा देव’ ही कथा ऑडिओ स्वरुपात प्रसिद्ध करत आहोत. दलवाई यांनी 1966 मध्ये लिहिलेली ही कथा साधना प्रकाशनाच्या 'जमीला जावद' पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. मुलं मोठी होत असताना असा एक क्षण येतो की, धर्मभेदाची जाणीव त्यांच्या मनात प्रवेश करते आणि तेव्हा ती आतून हलून जातात, त्याकडे ही कथा अंगुलीनिर्देश करते. या कथेचं वाचन केलं आहे मृद्गंधा दीक्षित यांनी.
-
राज्य सरकारचे 2019 साठीचे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात ललित गद्य विभागात प्रथम प्रकाशन असलेल्या सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार साधना प्रकाशनाच्या 'बिजापूर डायरी' या पुस्तकाला मिळाला आहे. डॉ. ऐश्वर्या रेवडकर लिखित या पुस्तकात छत्तीसगडमधील बिजापूर या जिल्ह्याचे सकारात्मक डॉक्युमेंटेशन आहे. सजग, संवेदनशील असणाऱ्या ऐश्वर्या यांनी पुस्तकात डॉक्टरी करीत असताना अनुभवलेले आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदल आणि सर्जनशील प्रयोग मांडले आहेत. 'बिजापूर डायरी'ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्याशी हिनाकौसर खान यांनी साधलेला हा संवाद.
-
राज्य सरकारचे 2019 साठीचे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात कृषी व पूरक व्यवसाय या विषयावरील सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाचा पुरस्कार मिळाला साधना प्रकाशनाच्या रमेश जाधव लिखित 'पोशिंद्याचे आख्यान' या पुस्तकाला. शेती प्रश्नावर व्यापक आणि विवेकी दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक आहे. 'पोशिंद्याचे आख्यान'ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी तसेच शेती प्रश्न आणि सध्या चर्चेत असलेल्या कृषी कायदे यांच्याविषयी रमेश जाधव यांच्याशी सुहास पाटील यांनी साधलेला हा संवाद.
-
In this freewheeling conversation with Shekhar Gupta, we try to understand his style and sense of journalism through his experience with a newspaper, magazine, and a digital news platform – as a reporter, and then an editor.
In this special segment of Shekhar Gupta's interview, we talk about his experience in the editorial role withThe Indian Express's coverage of the Anna Andolan and the 2005 US nuclear deal and the controversial cover of India Today's December 1992 edition. Mr. Gupta also talks about the lesser-known ADELPHI paper he wrote between 1993-94 titled ‘India Redefines its Role’ where he talked about the internal dynamics of India.
To read the full interview in English: https://kartavyasadhana.in/view-artic...
To read the full interview in Marathi: https://weeklysadhana.in/view_article...
ABOUT: Kartavya celebrated its first anniversary on 9th August 2020. On the backdrop of this special occasion, we decided to publish comprehensive interviews of three renowned editors of English journalism - N. Ram, Naresh Fernandes, and Shekhar Gupta.
Shekhar Gupta is currently the Chairman and Editor-in-chief of The Print. After starting his career as a reporter with The Indian Express in 1977, he went on to work as a reporter and then an editor at India Today. He has also been the editor-in-chief of The Indian Express from 1995 to 2014.
Kartavya Sadhanna: kartavyasadhana.in/
Weekly Sadhana : weeklysadhana.in/
-
In this freewheeling conversation with Shekhar Gupta, we try to understand his style and sense of journalism through his experience with a newspaper, magazine, and a digital news platform – as a reporter, and then an editor.
This third part of the interview talks about Shekhar Gupta's journey with The Print, the different initiatives he has launched under The Print, his perspective and understanding of digital journalism, the need to challenge the opinion industry in India, and a host of other issues with some valuable insights for prospective journalists.
To read the full interview in English: https://kartavyasadhana.in/view-artic...
To read the full interview in Marathi: https://weeklysadhana.in/view_article...
ABOUT: Kartavya celebrated its first anniversary on 9th August 2020. On the backdrop of this special occasion, we decided to publish comprehensive interviews of three renowned editors of English journalism - N. Ram, Naresh Fernandes, and Shekhar Gupta.
Shekhar Gupta is currently the Chairman and Editor-in-chief of The Print. After starting his career as a reporter with The Indian Express in 1977, he went on to work as a reporter and then an editor at India Today. He has also been the editor-in-chief of The Indian Express from 1995 to 2014.
Kartavya Sadhanna: kartavyasadhana.in/
Weekly Sadhana : weeklysadhana.in/
- Näytä enemmän