Episodes
-
संगीतामध्ये Aritificial Intelligence (कृत्रिम मेधा) आता सर्रास वापरली जात आहे. त्याच बरोबर अनेक नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही या वापरातून उद्भवत आहेत. काय आहे संगीतामधील एआयचं भवितव्य? कौशलकट्टाचा हा भाग संगीतामध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम मेधेबद्दल एक मुक्त चिंतन आहे. AI has now begun to invade all spheres of life and music is also one of them. Music composer Kaushal Inamdाr discusses the implications of using AI in music as A. R. Rahman is all set to release a song using the voices of two singers who are no more in his new film, 'Laal Salaam', but the use of their voices has been made possible with the help of AI.
-
काही वर्षांपूर्वी ग्रंथालीच्या ‘शब्दरुची’ या अंकात ‘संगीतक्षेत्रातील मराठी’ हा लेख मी लिहिला होता. आजच्या कौशलकट्ट्यावर मी या लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेख ५-६ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यामुळे काही त्यावेळचे संदर्भ जरी लेखात असले तरी भावसंगीत आणि मराठी भाषेचे संबंध कसे बदलत चालले आहेत हा विषय आजच्या काळालाही लागू आहे.
‘संगीताला भाषा नसते’ असं म्हणतात ती खरोखर नसते का? प्रेमगीतांची मिश्र भाषा मराठीत का ऐकू येऊ लागली? एका भाषेत संगीत करणारा संगीतकार जेव्हा दुसऱ्या भाषेत संगीत करतो तेव्हा तो पहिल्या भाषेच्या कुठल्या गोष्टी दुसऱ्या भाषेच्या गाण्यात आणतो? अशा वेगवेगळ्या विषयांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत.
Watch the episode on YouTube
https://youtu.be/J1CxD3FyHDQ
-
१९३३ साली पुण्याचा एक तरूण व्हायोलीनवादक लंडनला जायचं म्हणून ‘कॉन्टे रॉस्सी’ नावाच्या जहाजावर चढला आणि लंडनऐवजी व्हेन्तिमिलिया नावाच्या इटली आणि फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावात येऊन पोहोचला. एरवी मितभाषी असणारा पण सिंदबादच्या आणि सिंड्रेल्लाच्या कथा नातवंडांना रंगवून सांगणारा, रात्रभर जागून व्हायोलिन वाजवणारा, स्वतःच्या यशोगाथा कधीही स्वत:हून न सांगणारा या अवलियाचं नाव शंकरराव बिनिवाले - म्हणजे माझ्या आईचे वडील, माझे आजोबा. ही त्यांची कहाणी!
Watch on YouTube - https://youtu.be/ELMgV_xuqiU
-
#marathi #marathimusic #qanda #podcast चित्रपट संगीतात सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशी गीतं लिहिण्याचा गीतकरांना आग्रह केला जातो. साधारणपणे 'आकाशी झेप घे रे पाखरा' या गीतासारखी, तशी 'आशयघन' गाणी लिहिली तर नाकारली जातात, इतकं जड जड नको सांगितलं जातं. पण दुसरीकडे 'वाट दिसू दे गा देवा', 'खेळ मांडला' सारखी गाणी प्रसिद्ध होतात. तर आशयघन गीतं हा प्रॉब्लेम आहे की फारसं काळजात न उतरणारं संगीत ही अडचण आहे ? काय वाटतं ? कौस्तुभ अरूण आठल्ये
श्रवणसंस्कृती - https://www.youtube.com/live/TLPfI5_R6rY?feature=share
-
गाण्याच्या निर्मितीकडे पोहोचण्याचे दोन पंथ आहेत. यांतील शैव पंथ म्हणतो की आधी शब्द आणि नंतर चाल! तर वैष्णव पंथ म्हणतो की आधी चाल आणि नंतर शब्द! आजच्या ‘कौशलकट्टा’च्या भागात गप्पा मारू या दोन पंथांवर आणि त्यातून काय काय शक्यता उद्भवतात.
हा भाग यूट्यूबवर पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा!
https://youtu.be/DS9O4qdPODM
-
#kaushalinamdar #musicappreciation #listening लोकांना संगीत कसं आकळतं? आपण बेसूर असणं म्हणजेच सुरांची जाण असणं का? अशा अनेक प्रश्नांचा मी या व्हिडिओत उहापोह केला आहे. जरूर ऐका आणि शेअर करा!
Watch this episode on YouTube
https://youtu.be/TU0VSoezPK0
-
कविवर्य शंकर वैद्य - हे नाव प्रत्येक मराठी काव्यप्रेमीला माहित आहेच. मी महाविद्यालयातच असताना सरांना भेटलो. तेव्हापासून जे आमचे ऋणानुबंध जुळले ते सर जाईपर्यंत. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाचं मी केलेलं हे अभिवाचन आहे.
माझ्या पॉडकास्टला जरूर सब्स्क्राइब करा. आवडला तर नक्की शेअर करा!
हा पॉडकास्ट यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे.
कौशलकट्टा। पर्व ३। भाग १दीपस्तंभ । शंकर वैद्य।
-
‘कौशलकट्टा’ हा माझा पॉडकास्ट मी यूट्यूबवर चालवतोच आहे. पण केवळ आवाजाची दुनिया ही मला कायमच आकर्षित करत आली आहे. गेली अनेक वर्षं माझ्याकडे टीव्ही नव्हता परंतु रेडियो हा माझा घट्ट सवंगडी होता. आजवर तुम्ही मला दिलंत तसंच प्रेम माझ्या या पॉडकास्टला तुम्ही द्याल याची मला खात्री आहे.
यूट्यूबच्या माझ्या चॅनललाही जरूर सब्स्क्राइब करा त्याचा दुवा मी खाली देतो आहे.
कौशल इनामदारची यूट्यूब वाहिनी