エピソード
-
エピソードを見逃しましたか?
-
ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
-
सध्या महाराष्ट्रात 1, 2 नाही...चार चार हिंदुत्ववादी पक्ष झालेत. सगळेच म्हणतायत आम्ही हिंदुत्ववादी! पण, मुळात हिंदुत्व म्हणजे काय? या पक्षांचं हिंदुत्व कोणत्या व्याख्येत बसतं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
-
'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या पुण्यातील निदर्शनादरम्यान, 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली गेली, असे दावे झाले. मात्र, पुणे पोलीसांनी यावर पुरेसा प्रकाश टाकला नाही. alt न्यूज सारख्या fact चेकिंग वृत्त संस्थेने तर अशा घोषणा झाल्याच नाहीत, असं fact चेक करून टाकलं. मात्र, 'साम' टीव्हीला काय दिसलं? यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
- もっと表示する