エピソード

  • Breath is the bridge between body &  mind but scent is the magician who crosses this bridge riding on the air and merge with your heart like sugar dissolving in milk. But the urban generation is now losing the experience of smell because they don't even have a sense of the word "smell". Hence today's episode - Gandhpuran

    श्वास हा शरीर आणि मनाला जोडणारा पूल आहे आणि सुगंध ह्या पुलावरून जाणारा जादूगार आहे. गंध सुखवाहक; हवेवर स्वार होऊन येतात आणि दुधात साखर विरघळते तसे हे काळजात विरघळतात. परंतु शहरी पिढीला हल्ली गंधांचा अनुभव घेणेही दुरापास्त होत चालले आहे कारण त्यांना "गंध" या शब्दाचा गंध सुद्धा नाही. म्हणूनच हा आजचा एपिसोड - गंधपुराण

  • Victory in Defeat - Panipat 

    Today it is precisely 262 years since the Battle of Panipat, which is a memorable event in Indian history. Three generations of Marathi people were slaughtered in one single place on one single day. This day is perceived as a proverbial black day. 

    However, one must bear in mind that Marathas fought for national pride and self-esteem to protect India from invaders. Though unsuccessful. even in defeat, this war is overlaid with legends and acts as a source of inspiration for future generations.

    भळभळती जखम 

    कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती,

    तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानिपती !!

    पौष कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक १४ जानेवारी १७६१.

    भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल 262 वर्षे पूर्ण झालीत. मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.

    हिंदुस्थानाच्या दौलतीसाठी मराठेशाहीने जिव्हारी करून घेतलेली ही जखम जिच्या बखरी झाल्या, दंतकथा, पोवाडे झाले. यश नाही तर नाही पण असा पराभवच मिळवायचा की, यशांपेक्षाही राष्ट्राच्या भावी पिढ्यांना राष्ट्रगौरव, स्वाभिमान नि स्फूर्ती ह्यांच्या उगमस्थानाप्रमाणे उपयोगी पडेल.

    सर्व ज्ञात-अज्ञात मराठी वीरांच्या अतुल्य शौर्याचे स्मरण !  

    पानिपत १७६१..

  • エピソードを見逃しましたか?

    フィードを更新するにはここをクリックしてください。

  • Shivkalyan Raja 

    Chhatrapati Shivaji Maharaj's greatness lies in the fact that even after almost 350 years, his work, prowess and thoughts still evoke inspiration. Maharaj had so firmly established the idea of Swarajya, that even though some of Shivaji Maharaj's enemies within his family, his colleagues never wavered.

    But unfortunately, in our own Maharashtra, the political leaders are doing their best to widen the rift in the society by talking about Maharaj's caste and how did he behave with other communities or religions.

    This is the tragedy of our Hindu religion and the result is slavery for almost 750 years, first by Muslims and then by the British, in our big Hindu-dominated country. We are the ones to be blamed.

    शिवकल्याण राजा

    छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष की ज्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा आज सुमारे ३५० वर्षे झाली तरी अजूनही ताजी आहे. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, जरी शिवाजी महाराजांचे काही आप्तच त्यांचा विरोधात असले तरी त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत.

    परंतु दुर्दैवाने आपल्याच महाराष्ट्रात महाराज कुठच्या समाजाचे होते आणि त्यांची इतर समाजाबद्दल अथवा धर्माबद्दल काय भावना होती यावर राजकीय नेते मंडळी हिरीरीने पुढाकार घेऊन समाजातील दुही वाढवण्याचे काम चोख करत आहेत.

    हीच तर आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे आणि या शोकाची परिणीती काय तर आपल्या एवढ्या मोठ्या हिंदुबहुल खंडप्राय देशावर जवळजवळ ७५० वर्षे, आधी मुसलमान आणि मग इंग्रज, यांच्या गुलामीची वेळ आली. आपणच कपाळकरंटे आहोत. 

  • Dying Mumbai 

    The BMC elections are just around the corner. Soon we are going to witness the plethora of promises 

    In many old Hindi movies, we get glimpse of Mumbai in the 1950s and 1960s and it gives us goosebumps even today. But looking at the present situation, the day is not far off when Mumbai will become the filthiest city in the country. Why did this situation arise? Does this slum city have any future?

    मरणासन्न मुंबई 

    मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका आता काही महिन्यांनी होऊ घातल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आम्ही हे करू आणि ते करू अशा गमजा मारताना दिसतील. 

    कुठल्याही जुन्या हिंदी चित्रपटात दाखवलेली मुंबई जरा आठवून बघा, आज सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात. परंतु सध्याची मुंबईची घौडदौड बघता या देशातील सर्वात बकाल शहर म्हणून गणना व्हायला फार काळ शिल्लक नाही. ही परिस्थिती का निर्माण झाली? झोपडपट्ट्यांची नगरी झालेल्या या शहराला काही भविष्य आहे?

  • Gaavgada

    Generally everyone is fascinated by the concept of “village (गाव)” because it is related to the origin of man. But India has remained under foreign rule for hundreds of years, and the village has played a big role in it. Now the question will arise in your mind that we know what a village is but what is a Gaavgada (गावगाडा)? Listen on.

    गावगाडा

    सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला “गाव” ही संकल्पना भुरळ घालत असते, कारण ती माणसाच्या मूळाशी संबंधीत असते. परंतु हिंदुस्थान शेकडो वर्षे पारतंत्र्यात राहिला त्यात गावागाड्याचा मोठा वाटा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न उदभवेल की गाव म्हणजे काय माहिती आहे पण 'गावगाडा' म्हणजे काय? ऐका तर मग.

  • Caste Hatred

    Today, caste hatred is being spread deliberately. I think this is a farce for vote politics because if the sentence that only "Brahmins did injustice to Bahujan society for 5000 thousand years" is true, then the ancestors of Brahmins, who even today are only two to three per cent of the population, must have been either superman or bahubali?

    जाती द्वेष 

    आज सर्वत्र जातीय द्वेष जाणीवपूर्वक पसरवला जातोय असे दिसते. माझ्या मते हा मतांच्या राजकारणासाठी चाललेला तमाशा आहे कारण जर "ब्राह्मणांनीच 5000 हजार वर्ष बहुजन समाजावर अन्याय केला" हे वाक्य पूर्णत: खरं असेल, तर आज सुद्धा फक्त दोन ते तीन टक्के जनसंख्या असलेल्या ब्राह्मणांचे पूर्वज सुपरमॅन होते की बाहुबली? 

  • Caste System; जाती व्यवस्था 

    जेव्हा माणसा माणसात मित्रत्वाचे नाते निर्माण होईल तेव्हाच मनातील किल्मिषे दूर व्हायला मदत होईल. आणि हीच गोष्ट इतर धर्मियांबाबत देखील तितकीच खरी आहे. जोपर्यंत आपण गुणांचा आदर करण्याची वृत्ती आणि विवेकी वागणूक आपल्या आचरणात आणत नाही तोपर्यंत खरी समरसता येणे शक्य नाही.

    When there is a bond of friendship is formed between people, and there is an attitude of respect for virtues and prudent behaviour of others, only then harmony in society is possible. This is true for tussles between different castes as well as religions.

  • Customs & Traditions :

    Our forefathers created customs and traditions with the concept that society should be happy with minimum strife and less suffering in individual life. But they knew very well that it would be impossible without some deterrent or incentive to follow them. Please understand the reasons behind their creation and do not insult them.

    रूढी आणि परंपरा :

    आपल्या पूर्वजांनी कमीतकमी भांडणे होऊन समाज आनंदी राहावा आणि वैयक्तिक जीवनातील त्रास कमी व्हावा या संकल्पनेतून रूढी आणि परंपरा निर्माण केल्या. परंतु ते करण्यासाठी भीती किंवा आमिष, दाखविल्याशिवाय ते अशक्य आहे हे त्यांना नीट कळले होते. खूप विचारपूर्वक त्या निर्माण करण्यात आल्या आहेत म्हणून त्यामागील कारणे समजून घ्या आणि त्यांचा अपमान करू नका.

  • बरखा रानी

    जगाच्या पाठीवर पाकिस्तान पासून सुरु होणारा दक्षिण आशिया हा असा एकमेव प्रदेश आहे की जिथे फक्त जून ते सप्टेंबर या चार महिन्यातच पाऊस पडतो. मान्सून हे शास्त्र तांत्रिक आणि भूगोलाचे सखोल ज्ञान असल्याशिवाय कळत नाही त्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना पावसासंबंधी अनेक गोष्टी माहित नसतात. म्हणूनच हा "बरखा रानी" एपिसोड.

    South Asia starting from Pakistan is the only region in the world where it rains only in four months from June to September. Monsoon is not understood without deep knowledge of science, technology and geography, so many of us do not know many things about rain. Hence this "Barkha Rani" episode.

  • फेरीवाला... हे नाव उच्चारलं की अशा मंडळींची मांदियाळी माझ्या नजरेसमोरून तरळून जाते. ज्यांचे आपल्याला कुतूहल वाटावे असे अनेक फेरीवाले माझ्या लहानपणी दारावर येत असत. त्यावेळी या सगळ्याची एक वेगळीच मजा होती. आजच्या पिढीला मात्र फेरीवाले म्हणजे कोण हे देखील सांगावं लागेल. म्हणूनच विचार केला की फेरीवाल्यांच्या दुनियेची सफर घडवावी. चला, येता ना माझ्याबरोबर?

  • तुमची आमची मुंबई कायमच झोपडपट्यांनी भरलेली होती का? त्याची ओळख ही बजबजपुरी अशीच होती? ती कधी देखणी, सुंदर होती का? आणि असली तर काय रूप होते तिचे? चला, जरा मागे इतिहासात डोकावून पाहूया. बघा, तुम्हाला आवडते का ही मुंबापुरीची सफर?