Episoder
-
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय.जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो.संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्येशी संबंधित इतर पाहण्यांच्या मदतीने युनायटेड नेशन्स गेल्या 50 वर्षांपासून नियमितपणे जागतिक लोकसंख्येविषयीचे अंदाज मांडत आलेलं आहे. जगाची लोकसंख्या कधीपर्यंत वाढत राहणार? लोकसंख्येवर स्थलांतराचा कसा परिणाम होतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
Mangler du episoder?
-
8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या.9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली. आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं?भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय?भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत?समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला. अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले. या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसीनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - शरद बढे
-
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसीनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - शरद बढे
-
एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्या मुलाच्या कवटीमध्ये फीट नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच एक उपकरण बसवण्यात आलंय. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार. या आजारात Seizures येतात. म्हणजे फीट किंवा आकडी येणं. यालाच मिर्गी असंही म्हणतात. कवटीमध्ये बसवण्यात आलेला हा न्यूरोसिम्युलेटर मेंदूच्या आतवर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवेल. ओरान नॉल्सनला दिवसा येणाऱ्या फीटचं प्रमाण यामुळे 80 टक्क्यांपर्यंत कमी झालंय, तो आता अधिक आनंदात असून आयुष्य अधिक चांगल्यारीतीने जगू शकत असल्याचं त्याची आई जस्टिन यांनी सांगितलंय. कसं आहे हे उपकरण? ते काम कसं करतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - फर्गस वॉल्श निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - झुबैर अहमदनिवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता.
संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? यापूर्वी असं घडलं होतं का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - बीबीसी मराठीनिवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - शरद बढे
-
अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे.नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - निलेश भोसले
-
26 जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी 1987मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली. Drugs म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो. ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे शरीरावर, आयुष्यावर काय परिणाम होतात?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वेएडिटिंग - निलेश भोसले
-
वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे. हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल...हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय?
Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय. पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. आणि याचविषयीचा खबरदारीचा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलाय.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
-
प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय. पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं. मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - पल्लब घोषनिवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - निलेश भोसले
-
GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.
आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात?समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वेनिवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - निलेश भोसले
-
भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय. जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात. वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वेनिवेदन - विशाखा निकमएडिटिंग - निलेश भोसले
-
NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती.देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय.रिपोर्ट - उमंग पोद्दार निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
-
भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीचं सरकार आता भारतात स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागी विजय मिळाला पण पूर्ण बहुमत मिळालं नसल्याने त्यांना संयुक्त जनता दल (JDU) आणि तेलगु देसम पार्टी (TDP)ची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागेल.
आंध्र प्रदेशला Special Category Status - विशेष श्रेणी दर्जा देण्यात यावा ही मागणी गेल्या दशकभरापासून अधिक काळ करण्यात येतेय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आंध्र प्रदेशाला असा विशेष दर्जा देण्याचा मुद्दा होता आणि आपण हे वचन पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 4 जूनला निकालाच्या दिवशी याबद्दलचं सूचक ट्वीटही केलं होतं.
भाजपला आता चंद्राबाबू नायडू आणि तेलगु देसम पार्टीची गरज असताना चंद्राबाबू राज्याला विशेष दर्जा देण्याची मोठी मागणी ठेवतील असा कयास आहे. सोबतच भाजपला पाठिंबा जाहीर करणारे नितीश कुमारही बिहारला असा विशेष श्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
हा स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय असतो? असा विशेष दर्जा मिळाल्याने राज्यासाठी काय बदलतं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वेनिवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
-
मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - इक्बाल अहमदनिवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
-
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
-
पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का? हेच मुद्दे आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.लेखन - गणेश पोळनिवदेन - विशाखा निकमएडिट - निलेश भोसले
- Se mer