Bölümler

  • सेवा सदनचे श्रीयुत नितीन लेले यांची जयश्री पटवर्धन अर्थात आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत...
    आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

  • Eksik bölüm mü var?

    Akışı yenilemek için buraya tıklayın.

  • कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शंकरराव मगर यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत अत्यंत अभ्यासपूर्ण कृषी क्षेत्रातील भविष्य कृषी क्षेत्रातला डॉक्टर मगर यांचा दीर्घ अनुभव अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलाखतीत मांडण्यात आलेले आहेत आपल्या प्रतिक्रिया 9422776759 फोनवर अवश्य द्यावे

  • जळगाव येथील पत्रकार कॉलनीत राहणार्‍या मृणालिनी विजय चौघुले यांनी 28 वर्षात 18000 हजार स्वेटर विणून अनाथ बालकांना भेट दिले... या ईश्वर कार्याबद्दल मुलाखत

  • ज्ञान भारती मराठी पॉडकास्टचा 51 वा भाग सुप्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.खास लेख

    *मुलांसाठी शब्दांची नवलाई लिहिणारे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड...*

    खानदेशातील जळगाव येथील जैन इरिगेशनच्या कांताई हॉलमध्ये सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे ७ व ८ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कारही मिळाला; त्या निमित्ताने आव्हाड यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट होय. त्यांच्या लेखन प्रवासाबाबत त्यांच्याशी जळगाव येथील सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी खास गप्पा मारल्या. अत्यंत प्रेरक व बालसाहित्यातून शिशुगट ते कुमारगटातील मुलांवर उत्तम असे वाचन संस्कार या मुलाखतीमुळे होऊ शकतात म्हणून खास वाचकांसाठी...

    एका चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेलं असतं. तो चित्रकार चित्रात रंगसंगती अफलातून वापरत असतो. अनेक लोक, रसिक त्या चित्रकाराचं प्रदर्शन बघायला येतात. चित्रांचे प्रदर्शन बघायला एक पत्रकार महिला देखील येते. ती चित्रकाराला विचारते, 'तुमची चित्र आकर्षक सुंदर आहेतच पण त्यातली रंगसंगती अधिक आकर्षित करून घेणारी आहे. फारच वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे.तुम्ही कोणत्या रंगात कोणता रंग मिसळता की त्यातून एक वेगळाच रंग तयार होतो.जो मनाला आकर्षित करतो. या प्रश्नावर तो चित्रकार पत्रकार महिलेकडे पाहून हसला आणि म्हणाला, 'मुली, मी असं ठरवत नाही की अमुक रंगात तमुक रंग मिसळायचा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो. पण त्या रंगात मी माझं अंतरंग मिसळतोच मिसळतो. कारण कुठलेही चित्र बाह्यरंगामुळे कधीच सुंदर होत नाही. हीच गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू पडते.आपण हाती घेतलेल्या कामात जर आपण आपलं अंतरंग मिसळले तर ते काम इंद्रधनुष्यासारखे नक्की फुलून येईल.... पालक आणि विद्यार्थ्यांना असा मोलाचा संदेश देणारे एकनाथ आव्हाड हे बालकविता तर लिहितातच पण कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम देखील त्यांचे यशस्वी झालेले आहेत. ते बालसाहित्याकडे कसे वळले याबाबत खूप छान सांगतात...
    वयाच्या विसाव्या वर्षी मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. प्रसंग रसाळ पद्धतीने सांगणे हा वारसा आईकडून माझ्याकडे आला.यालाच पुढे कथाकथन म्हणतात असे कळले. आई महानुभाव पंथातली होती. आदरतिथ्य हा तिचा स्वभावगुण होता. घरी कुणी येऊन गेले की तो प्रसंग आई छान रंगवून सांगत असे. खरे तर कथाकथन करण्यासाठी आईचा हा गुण मला खूप कामी आला. मुंबई महानगरपालिकेचा मी एकेकाळचा विद्यार्थी. पुढं शिक्षक झाल्यावर मुंबई महापालिकेच्याच शाळेतच शिक्षक म्हणून रुजू होणे ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट. नवीन उत्साह, नव्या जाणीवा सोबत असल्याने एकनाथ आव्हाड यांनी खूप उपक्रम राबविले. त्यांच्या वर्गात एक विद्यार्थिनी होती. तिच्यावरच त्यांनी पहिली कविता लिहिली....सविता पटेकर सतत गैरहजर...! चिमुकली बालगोपाळ मंडळीआव्हाड यांना भेटली की त्यांना आनंद होतो. त्यांच्या आनंदाची बाग फुलवावी, मुलांना वाचते करण्यासाठी छान छान कविता गोष्टी, लिहाव्यात, ऐकवाव्यात. या करण्यासाठी एकनाथ आव्हाड बालसाहित्य लेखनाकडे वळले. मुलांच्या निकोप वाढीसाठी गोष्टी-कविता-गाणी यातून होणारे हे संस्कार खूप मोलाचे असतात. मुलांना उद्देश नकोच असतो. परंतु एखाद्या गोष्टीतील चरित्राने जर मुलांमध्ये चांगली वागणूक निर्माण व्हायला मदत झाली किंवा जी व्यक्तिरेखा त्या कथेत चितारली आहे; आपणही त्यासारखं वागू या असा विचार मूल करू शकतं. लहानपणापासून चांगले वागण्याचा प्रयत्न तो करत राहतो असे आव्हाड आत्मविश्वासाने म्हणतात. पुस्तकावर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. आव्हाड लहान असताना आपल्या खाऊचे मिळालेले पैसे साठवून त्या पैशातून गोष्टींचे पुस्तक ते विकत घेत असत. लहानपणी वाचनाची गोडी लागल्यामुळे आपण लेखन करू लागलो हा स्वानुभव ते आवर्जून सांगत असतात. खरे तर जसे आपण महिन्याचे किराणा आणतो, त्याची यादी बनवतो. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असते. त्याप्रमाणेच दर महिन्याला पुस्तक खरेदीची तरतूद करण्यात यावी. पुस्तक खरेदी करून कपाटाची फक्त शोभा करायची का? तर मुळीच नाही, घरात वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. पालकांच्या हातात मोबाईल आहे व ते पालक मुलांच्या हाती बळजबरी पुस्तक देऊन वाचायला सांगतील तर ती मुलं वाचायला कशी बरं तयार होतील? घरात आधी आई-वडिलांच्या हातात पुस्तक दिसलं पाहिजे, त्यांनी वाचन करायला घेतलं की मुले ते पाहून अनुकरण करतील, वाचायला सुरुवात करतील.

  • श्रोते हो, आपल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळवणारे डॉक्टर राजस नित्सुरे यांची आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत. ज्ञानभारती मराठी पॉडकास्टचा हा 50 वा म्हणजेच सुवर्णमहोत्सवी भाग! आपण सर्व श्रोत्यांनी या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपलं ऋणी व्यक्त करतो. येणाऱ्या कोणत्या तरी एखाद्या शनिवारच्या भागात झालेल्या या 50 एपिसोडस् चा एक छोटासा आढावा आम्ही घेणार आहोत. येणाऱ्या या भागाकडे आपण नक्की लक्ष द्या...आढावा घेतलेला एपिसोड अपलोड झाल्यावर आपल्याला ते कळेलच परंतु; या सुवर्णमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या एपिसोडमध्ये आम्ही काही प्रमाणावर ती बदल करणार आहोत... उदाहरणार्थ आम्ही 'ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट'चा युट्युब एपिसोड याकडे देखील आता लक्ष देणार आहोत. युट्युब चॅनेल आणि हे ऑडिओ चॅनल या दोन्ही माध्यमातून आपल्या पर्यंत आम्ही पोहोचणार आहोतच, असेच प्रेम कायम असू द्या. काही सूचना काही एपिसोडच्या बाबतीमध्ये आपलं मत प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद! किशोर कुळकर्णी, ज्ञानभारती पॉडकास्टर 9422776759

  • ज्ञानभारती मराठी पॉडकस्टसाठी मनीषा कुंजीर यांची माधुरी भट व किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

  • भारतात गोली वडा पाव च्या 350 हून अधिक औटलेट्स दर महिन्याला 200 कोटी रुपयांचा पगार आणि चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते असं सगळं या गोली वडापाव च्या माध्यमातून होत आहे विशेष महत्त्वाचे म्हणजे या गोली वडापाव च्या त्यांचे जी संपूर्ण भारत भर दिले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून गोरगरिबांना वडापाव मिळतो स्वस्तामध्ये मिळतो आणि लोकांना रोजगार देखील मिळते या गोली वडा पाव चे संस्थापक उद्योजक व्यंकटेश अय्यर यांनी गोली वडा पाव ची यशोगाथा सांगितले जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जितो जळगाव चॅप्टर तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमास व्यंकटेश अय्यर यांची भेट झाली आणि त्यांना परकास विषयी विचारणा केली असता सार्वजनिक हा जो कार्यक्रम होतं तोच तुम्ही तरी कॉल करा आणि तो प्रसारित करा हे त्यांनी मला सांगितलं आणि खूप छान गोलीचा हा प्रवास आपल्याला ही रंजक वाटेल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा....

  • मुंबई येथील पक्षी प्राणी प्रेमी नंदी निपाणीकर यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

  • महाराष्ट्रातील पहिले सी प्लॅन पायलट कॅप्टन निखिल जाधव यांचा संघर्ष प्रवास आणि करियर करणाऱ्या युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशी ही मुलाखत आपल्याला कशी वाटली याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा - किशोर कुळकर्णी

  • ज्ञानभारती पॉडकास्ट 44 वा भाग पुणे येथील कांचन फडके यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

  • श्री.खरमाळे रमेश गणपत *शिवनेरी भुषण*
    *(माजी सैनिक खोडद)*
    प्रकाशित पुस्तक - *"जगेन मायभू तुझ्यासाठी"*
    अतिशय गरीब कुटुंबात मु.पो खोडद ता. जुन्नर जिल्हा पुणे येथे जन्म : १३/११/१९७६
    शिक्षण :- बी. ए
    *भारतीय सैनिक सेवा १९९५ ते २०१२*
    * २०/८/१९९५ मध्ये "मराठा लाईट इन्फैट्री" बेळगाव मध्ये भारतीय सैन्यात भरती. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरूणाचल प्रदेश,हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर मध्ये सेवा.
    १७ वर्षे देशसेवा करून हवालदार रैंक मधुन सन.२०१२ मध्ये रिटायरमेंट.
    * रिटायरमेंट नंतर २०१२/१३ थेरगाव (पुणे) युनियन बॅकमध्ये गनम्यान म्हणुन ६ महीने नोकरी
    *सध्या कार्यरत आहे २०१४*
    वनविभाग जुन्नरमध्ये वनरक्षक पदावर नियुक्ती.

    *तत्पर आपात्कालीन केलेली मदत*

    १) माळशेज घाटात एस टी दरित गेलेल्या ॲक्सीडेंट मध्ये २७ मृतदेह बाहेर काढण्यास व रोप बांधून मदत कार्य.

    २) किल्ले हडसर पाहण्यासाठी आलेले पुण्याचे १६ पर्यटक रात्री खिळ्याच्या वाटेवर अडकले होते त्यांची सुटका करण्यात प्रमुख सहभाग होता. या कार्यासाठी पुणे जिल्हा पालकमंत्री श्री. गिरष बापटसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डि.वाय.एस.पी सौ. जयश्री देसाई मॅडम यांनी प्रशंसापत्र प्रदान केले.

    ३) बेल्हे गावातील एकाच कुटूंबातील तीन व्यक्ती विहीरीत पडुन मृत्यूमुखी पडल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारीच्या कार्यात प्रमुख सहभाग होता. या कार्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. जय जाधवसाहेब यांनी सत्कार केला. तर डि.वाय.एस.पी सौ. जयश्री देसाई मॅडम यांनी प्रशंसापत्र प्रदान केले.

    ४) २०१७ मध्ये रात्री कुकडी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींना जिवदान देण्यात मुख्य भुमिका करण्यात यश आले.

    ५)२०१७ मध्ये जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथील वानरलिंगी येथून २०० फुट खोल दरीत पडलेल्या भोरच्या पर्यटकाला काढण्यात प्रमुख भुमिका निभावत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

    ६) ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जुन्नर तालुक्यातील भुतलेणी समुह पाहण्यासाठी आलेल्या परदेशी कोरीयाच्या अभ्यासकांवर झालेल्या मधमाशी हल्ल्यात २१ जखमी अभ्यासकांस बचावासाठी मदत केली.

    ७) २०१८ मध्ये जिवधन किल्यावर घसरून पडलेल्या पुण्याच्या पर्यटकाला खाली आणण्यासाठी मदत करण्याची संधी मिळाली.

    ८) २०१८ जुन्नर येथील बारवमध्ये बुडालेल्या शालेय विद्यार्थास शोधन्यास मदत.

    ९) वनविभाग जुन्नर मध्ये नोकरी करताना विहीरीत पडलेल्या जवळपास ३२ बिबटय़ांना रेस्क्यू द्वारे जीवदान देण्यासाठी मदत.

    १०)इतर जखमी पक्षी प्राणी व सर्प यांना उपचारासाठी मदत व विविध रेस्कुद्वारा जीवदान देण्यासाठी मदत.
    ११) शिवजन्मोत्सवादिनी किल्ले हडसर वर तोल जाऊन ५०० फुट दरीत कोसळलेल्या श्रध्दा कामठे या २० वर्ष वयाच्या मुंबईच्या तरूणीस रेस्कु द्वारा काढण्यात योगदान.
    १२)दि.१२/१०/२०२० रोजी कु. प्रतिक तळेकर ता. खेड येथील हरिश्चंद्रगडावर तीन दिवस भटकत असलेल्या मुलाचा रात्री रेस्कु करून शोध घेतला व त्या मुलास नातेवाईकांकडे सुखरूप हवाली केले.

    * फेसबुक पेजच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा दिलेला हात*
    "निसर्गरम्य जुन्नर तालुका पेज च्या माध्यमातून गरजुंना केलेल्या आव्हानांनद्वारे झालेली मदत

    १) पिंपळवंडी येथील दिड वर्ष वयाच्या डोक्यावर पडून कोमात गेलेल्या बाळासाठी ४.८० लाखांची जनतेकडून मदत.

    २) ह्रदय ट्रांन्स्परन्टसाठी कु. रेवती देशपांडे या नऊ वर्षे मुलीसाठी २४.८० लाखांची जनतेकडून मदत.

    ३) हडसर येथील यनिराम सांगडे यांच्या शॉर्टशर्किट घराला लागलेल्या आगीत मदत म्हणून लेण्याद्री ते हटकेश्वर आयोजित ट्रेकद्वारा १५ हजारांची मदत.

    ४) जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सुकाळवेढे गावातील सर्पदंश झालेल्या ५ महिने गरोदर रेणुकास ४१ हजारांची मदत.

    ५) जुन्नर तालुक्यातील पिंपरवाडी येथील उषा डामसे या महिलेस उपचारासाठी २१ लाखांची आव्हानातू मदत.

    ६) जुन्नर तालुक्यातील कोपरे गावच्या काठेवाडी येथील अजय नाना काठे या १० वर्ष वयातील कॅन्सरग्रस्त बालकास केलेल्या आव्हानातून १.७० लाखांची मदत व अनामिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण चेह-याचे आॅपरेशन केले.

    *जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा प्रथमच तेलुगु भाषेत*
    सन २०१९ साली जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा सचित्र व नावासहित तेलगु भाषेत ११ वीच्या बालभारती पुस्तकात समाविष्ट करण्यात योगदान

    *४२ बारवांचे संशोधन*
    सन‌ २०२१ पर्यंत जुन्नर तालुक्यातील ४२ बारवांचे संशोधन व स्वच्छता अभियान राबवत जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

    *पाणी अडवा पाणी जिरवा समतल चर निर्माण*

    जुन्नर तालुक्यातील धामणखेल डोंगर माथ्यावर सलग ६० दिवसांत ३०० तास काम करत पत्नी सोबत दोघांनी ७० जलशोसक समतल चर खोदून तयार केले

  • पत्रमहर्षी बाळशात्री जांभेकर यांच्या द्विशतकोत्तर जयंती म्हणजे पत्रकारितेचे प्रबोधन वर्ष ज्ञानभारती मराठी पॉडकास्टचा विशेष भाग

  • ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट चा हा 40 वा भाग! मिरज येथील डॉ. हर्षद दिवेकर यांनी जपानीपद्धतीने वृक्ष लागवड प्रयोग यशस्वी केलेला आहे. कमी कालावधीमध्ये घनदाट जंगल निर्माण करण्याची क्षमता या पद्धतीमध्ये आहे. महाराष्ट्र शासनाने देखील या वृक्ष लागवड पद्धतीचा प्रयोग मान्य केलेला आहे. डॉ. हर्षद दिवेकर यांच्याशी केलेली ही बातचीत आपल्याला नक्की आवडेल. हा एपिसोड कसा वाटला याबद्दलच्या आपल्या अनमोल प्रतिक्रिया 94 22 77 67 59 या क्रमांकावर व्हाट्सअप पाठवाव्या ही विनंती...



  • कविवर्य ना धो महानोर यांनी पळसखेडच्या सीताफळ बागेला 'लता मंगेशकर उद्यान' तर त्या बागेत पिकलेल्या गोड, चविष्ट फळांना 'लता फळ' असे नाव दिलेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कविवर्य ना. धों. महानोर यांनी ऐकली त्यांना खूप दुःख झाले. जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख काय असते हा अनुभव मी माझी पत्नी सुलोचना चार महिन्यांपूर्वी गेली तेव्हापासून घेतलेला आहे. मी उदास आहे माझ्या जीवनात सुखाचा क्षण वाटत नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यामुळे त्या प्रत्येकाच्या अगदी जवळच्या व्यक्ती झालेल्या आहेत. त्यांचे गाणे ऐकणारा प्रत्येक व्यक्ती दुःखात आहे. यांच्या जाण्याने मलाही अतीव दुःख झाले आहे. लता दीदींच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल अशी प्रतिक्रिया कविवर्य ना धो महानोर यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर यांच्या बाबत अत्यंत भावविभोर होऊन कविवर्य ना धो महानोर बोलत होते. त्यांच्या भावना पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत.

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि माझे 1970 पासूनचे संबंध आहेत. मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो तेव्हा ५ ते ६ तास होतो. ही भेट आणि मनसोक्त गप्पा त्यावेळी झाल्याचे आठवतं. त्यानंतर लतादीदींनी त्यांच्या स्वतःच्या चित्रपटासाठी 'जैत रे जैत' करिता माझ्याकडून गाणे लिहून घेतले. दोन तासाच्या या चित्रपटातील एक तासांची माझी सोळा गाणी आहेत. हे गाणे लिहिण्यासाठी मी तयार नव्हतो. कारण यापूर्वी चित्रपटांसाठी मी गीतलेखन केलेले नव्हते. दीदी मला म्हणाल्या होत्या की, 'माझ्याजवळ फार लिहिणारे आहेत पण या चित्रपटासाठी तुम्हीच गीतलेखन करा!' असा आग्रह दीदींचा होता. गंमत अशी की प्रभू कुंजला 19, 20 आणि 21 मार्चला म्हणजे गुढीपाडवा देखील मी प्रभू कुंज मध्येच साजरा केला. चाळीस-बेचाळीस वर्षानंतर देखील ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. माझ्या लेखनाला दीदींचा सूरस्पर्श, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत लाभले. त्यामुळे अजरामर कलाकृती जन्माला आली. या चित्रपटातील गाणी गाजलेली, लोकप्रियता मिळाली. चित्रपट मनासारखा झाला. पुन्हा तीन चार वर्षांनी दिदींकडून फोन आला. 'आम्हाला अजून सहा गाणी करायची आहेत. आपण ते करून द्यावेत!' असा पुन्हा त्यांच्याकडून मला आग्रह झाला. अजिंठा ते सातपुडा या लोककला, गीतांचा लहेजा, शब्दकळा, लोकगीत आणि लोकसंगीत असे एकत्र करण्याची लता दीदींनी इच्छा बोलून दाखवली. त्या गाण्यामध्ये तीन लावण्या, एक वही गाणे आणि दुःखाचे गाणे अशी निवड त्यांनी केली होती. त्यातील क्लासिकल लावणी 'राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही...' लावणी लतादिदींनी गायली आहे. 'किती जिवाला राखायच राखल राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकल...' 'आभाळ भरून आलं ...' हे गाणे असेल किंवा 'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या ...' हे दुःखी गाणं पण आहे. 'राजा माझ्या अंबाडा ला बांधा गजरा... चांद केवड्याची रात आली' हा वही गायन प्रकार त्यांना रुढ करायचा होता. ही ६ गाणी एच एम व्हीच्या वतीने रेकॉर्ड करून घेतले. माझ्या रचनांमध्ये त्यांना काही गोष्टी सापडल्या आणि त्यांनी या अल्बमला 'माझ्या आजोळची गाणी' असं नाव दिले. थाळनेर ते खानदेश अजिंठा ते सातपुडा या प्रदेशातील त्यांना अभिप्रेत असलेल्या शब्दकळा, गीत, संगीत आणि जगणे त्यांनी माझ्या कवितेतून निवडून श्रोत्यांसमोर पेश केल्या. दूरदर्शनच्या 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा' या संग्रहित असलेल्या कार्यक्रमात अनेकदा प्रसारित केलं जातं. मला पेरणी असल्यामुळे दूरदर्शनला रेकॉर्डिंग ला जाता आले नव्हते म्हणून प्रिया तेंडुलकर यांना घेऊन या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्यात आले.
    रमेश देव यांच्या 'सर्जा' चित्रपटासाठी 'चिंब पावसानं रानं झालं आबादानी...' हे गाणं लतादीदींनी म्हटले तसे बरेच गाणे त्यांनी स्वरबद्ध केलेले आहेत. माझी जवळजवळ तीस चाळीस गाणी आशाबाई, हृदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी गायलेली आहेत. लतादीदींनी माझ्याकडून गीतरचना करून घेणे हा भाग्ययोग माझ्या जीवनात आला. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लता मंगेशकर यांची सुबत्ता, प्रसिद्धी जगाला दिसते. त्यामागे लता मंगेशकर यांचे अफाट कष्ट, सातत्य आणि परिश्रम हे आहेत. आज जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये सुमारे 32 हून अधिक भाषांमध्ये त्यांचे गाणे ऐकायला मिळतात. दीदींना भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' पण प्राप्त झालेला आहे. हे सौभाग्य लतादीदी यांच्या जीवनात आले. त्यांचे 'ए मेरे वतन के लोगो ...' या गाण्यापासून तर प्रेम गीत, नाट्य गीते, चित्रपट गीते, गझल, भक्तिगीते या सगळ्यांना दिदींचा स्वर मिळाला. त्यांनी आपल्या आवाजाचाखूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. किशोर कुळकर्णी, 9420607059

  • ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट 38 वा भाग सुप्रसिद्ध लेखक उद्योजक आणि सामाजिक संशोधन करणारे खानदेशातील मुळचे राहणारे संजय सोनवणी यांची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली आहे. योगायोग असा की संजय सोनवणी यांचा ८ फेब्रुवारी २०२२ रोजी जन्मदिवस आहे. त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! श्री. सोनवणी यांचे शंभरावे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. आपल्या आयुष्यामध्ये इतके १०० पुस्तक लिहिणारे लेखक आणि तेही खानदेशचे! म्हणूनच आपण साऱ्या खानदेशी व्यक्तींना त्यांचा सार्थ अभिमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेलेल्या संजय सोनवणी यांनी उद्योग क्षेत्रांमध्ये देखील खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांनी ८ वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी आपला उद्योग व्यवसाय इमाने इतबारे केला. ८ कंपन्यांपैकी २ कंपन्या लिस्टेड कंपन्या म्हणून होत्या. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये दोन लिस्टेड कंपन्यांचा नेतृत्व करणारे संजय सोनवणी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव असावे. आपल्या लेखन व संशोधन कार्यासाठी संपूर्ण वेळ देता यावा यासाठी त्यांनी आपले उद्योग व्यवसाय सोडून दिले. कंपन्या विकून त्या पैशांवर संशोधन कार्य व चरितार्थ चालवित आहेत. "आपल्या आयुष्यात लेखक म्हणून आपल्याला जगायचे आहे." हा मोठा उदात्त हेतू त्यांनी ठेवलेला आहे.

  • पुणे येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक गुरू सावंत यांची खास प्रेरणादायी मुलाखत...ही मुलाखत युट्युबवर ही उपलब्ध

  • जळगाव येथील पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांची किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. हा भाग आता युट्यूब वर देखील उपलब्ध...