Bölümler

  • सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला पुस्तके, ग्रंथ, काही मान्यवर व्यक्ती आणि अर्थातच एपिलॉग मीडियाचे अभिजीतसर, रोहन व सर्व तंत्रज्ञ यांची मदत झाली. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. ह्या आमच्या पॉडकास्ट मालिकेतील सर्व भागांविषयी संक्षेपात माहिती देण्याचा प्रयत्न, आम्ही ह्या शेवटच्या भागात केला आहे. आम्हाला खात्री आहे, की, ही माहिती ऐकल्यावर जर तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणताही भाग मिस केला असाल, तर तो नक्कीच ऐकाल आणि सर्व सणांची माहिती नक्की एन्जॉय कराल... याच नोटवर आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद🙏

    सहभाग -
    डॉक्टर सौ. स्वाती कर्वे, सरोज करमरकर,
    अपर्णा मोडक.

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • नमस्कार श्रोतेहो,
    तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
    मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.
    सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...
    मग नक्की ऐका...

    संकल्पना व सहभाग -
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या स्वाती कर्वे
    सौ.सरोज करमरकर

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • Eksik bölüm mü var?

    Akışı yenilemek için buraya tıklayın.

  • भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो.
    या दिवशी ,भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
    ह्या संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची माहिती या पॉडकास्ट मधून आपणास मिळेल.
    बीटिंग द रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते .
    'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है' ह्या आजच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून, आपल्या देशातील शहिदांना मानवंदना देऊया.
    याचबरोबर माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती आणि महाशिवरात्र ह्या उत्सवांबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया.

    संकल्पना व सहभाग -
    वैद्या स्वाती कर्वे,
    सौ.अपर्णा मोडक,
    सौ.सरोज करमरकर

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • नमस्कार श्रोतेहो,
    "तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!"
    मनातील सर्व भेदभाव, कटुता बाजूला सारून प्रेमाचे, आपुलकीचे नाते नव्याने जपण्याचा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण... मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मिरवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ, तिळाची वडी तिळाचा काटेरी हलवा, गुळपोळी यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचा दिवस... मग याच मकर संक्रांतिविषयी व त्याबरोबर पौष महिन्यातील काही दिनविशेषांची माहिती घेऊया आपल्या आजच्या पॉडकास्टमधून. सादरकर्त्या आहोत... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...
    मग नक्की ऐका...

    संकल्पना व सहभाग -
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या स्वाती कर्वे
    सौ.सरोज करमरकर

    Hello listeners,

    Wish you all great Makarsanskranti !!!

    Our today's podcast will enlighten your Makarsankranti festival celebrations. This is the festival of building the relationship of love, affection, empathy. Keeping away all differences, bitterness and rejuvenating the lovely relations as sweet as the teelgul (sesame seeds laddu). It's also the festival of kite flying. Let's learn more about it.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • कर्मण्येवाधिकारस्ते
    मा फलेषु कदाचन ।
    मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

    मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्दल जाणून घेऊया.
    सुमारे 5000 वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदेश आणि महान विचार दिला. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे सार म्हणजे भगवद्गीता असं म्हटलं जातं. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेले कित्येक विचार भगवद्गीतेत सांगितले गेले आहेत. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटाच्या क्षणी आधारग्रंथ ठरणारी, आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्रस्थापित करण्यासाठी आपला खरा मार्गदर्शक ठरणारी ती भगवद्गीता. संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता, सामान्य माणसांना कळावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती प्राकृत भाषेत आणली.
    चला ह्या गीतेचे सार ऐकुया विदुषी स्वाती कर्वे यांच्याकडून....

    संकल्पना व सहभाग -
    वैद्या स्वाती कर्वे,
    सौ.अपर्णा मोडक,
    सौ.सरोज करमरक

    Hello listeners,

    Our new podcast is on air. This podcast 'Karmanyevadhikarste…' will give you an overview of Bhagavad Gita..Our Sacred Hindu Book. Margashirsha Shukla Ekadashi or Mokshada Ekadashi is celebrated as Geeta Jayanti. It is the day on which Lord Krishna gave the archer Arjun the divine message of life and thought through the Bhagvad Gita, about 5000 years ago. It is celebrated everywhere in India as well as outside of It.
    In today's days, when people are confused and misdirected, the Gita becomes more relevant for them as individuals and for the society at large in bringing back the stability and happiness in life.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • Hello listeners,

    Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brought today's podcast ' Lakh lakh chanderi tejachi aali Diwali' to enlighten your festival celebrations.
    Diwali or Deepavali is the festival of lights (Deep). It is considered the king of festivals in India. In the middle of autumn i.e. on the occasion of the Ashwin-Kartika months, this festival occurs. We start getting nostalgic with Diwali and it's all about abhyang bath, special rangoli, earthen lamp lighting, kandil (lantern), new clothes, new ornaments, greeting cards, sweet snacks, delicious mouth-melting desserts, forts made by children and firecrackers are all things that make our heart happy.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve

    "लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी" -
    नमस्कार श्रोतेहो, दीपावली हा दिव्यांचा उत्सव. भारतामध्ये हा सणांचा राजाच मानला जातो. शरद ऋतूच्या मध्यभागी म्हणजे अश्विन-कार्तिक महिन्यांच्या संधीवर, हा सण येतो. दीपावली म्हटलं की अभ्यंग स्नान, दरवाजासमोर रांगोळी, पणत्यांचा दीपोत्सव, नवीन कपडे, नवीन अलंकार, आकाश कंदील शुभेच्छापत्र, गोड गोड फराळ, मिष्टान्न भोजन, बच्चेकंपनीने बनवलेले किल्ले आणि फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या गोष्टी अगदी मनाला आनंदित करणाऱ्या. दिवाळी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, गरीब श्रीमंत या सर्वांना आनंद प्राप्त करून देत असते. आज.. मी, सरोज आणि स्वाती तुमच्यासाठी दीपावलीच्या निमित्ताने ‘लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी’ हा खास पॉडकास्ट घेऊन आलो आहोत.
    मग नक्कीच ऐकणार ना... तुम्हा सर्वांना दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा जणू सृजनाचा उत्सव... निसर्ग सर्वांगाने बहरलेला.... सर्वत्र चैतन्य, आनंद,उत्साहाचे वातावरण .. या शारदोत्सवाच्या निमित्ताने नवरात्रातील देवीची नवरूपे,त्यांची आराधना-उपासना करण्याच्या पद्धती, रीतीभाती याबद्दल जाणून घेऊया आरती, भजन, गोंधळ, जोगवा अशा अनेक गीतप्रकारांच्या साथीने..
    पहिल्या दिवशी घटस्थापना, ललिता पंचमी व्रत,अष्टमी व नवमी ह्या महातिथी ,अष्टमीला श्रीमहालक्ष्मी पूजन, तर खंडेनवमीला शस्त्रपूजा... आणि विजयादशमी म्हणजेच दसरा सणाचे महत्त्व याबद्दल माहिती घेऊया.
    त्याचबरोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचे वैशिष्ट्यही
    ऐकूया.
    चराचरात चैतन्य निर्माण करणाऱ्या आदिमायेला वंदन करून तिला प्रार्थना करुया की, हे चैतन्य,ही ऊर्जा आम्हांलाही दे. सर्वांना आनंद, सुख लाभू दे.
    सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके |
    शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ||

    संकल्पना व सहभाग
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या स्वाती कर्वे
    सौ.सरोज करमरकर
    सौ. नेहा करमरकर

    First ten days of the month of Ashwin are celebrated in all states of India as 'Navaratrotsav - festival of Godess Durga'..who symbolises our Mother earth... it is a festival of creation... the nature is in full bloom... there is vitality, joy, enthusiasm everywhere... So let's learn about the traditions, rituals and mesmorizing songs like Aarti, Bhajan, Ghondal, Jogwa..sung during Navaratrotsav.

    The first day of Navaratri is known as Ghatasthapana, then comes Lalita Panchami Vrat, Ashtami and Navami Maha Tithi, Shri Mahalakshmi Pooja on Ashtami, Weapon Pooja on Khandenavami... and the importance of Vijayadashami i.e. Dussehra festival.

    Let's also know some facts about Sharad Poornima i.e. Kojagiri Poornima.

    Let's surrender ourselves to Adimaya, who is a creator and pray to her for our wellness, consciousness, strength positive energy and happiness.

    Concept and Participation -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve.
    Neha Karmarkar

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. रूढार्थाने जरी हा कोणताही सण, उत्सव नसला तरीही आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्या दिवंगत आप्तेष्टांप्रती आदर, सद्भावना व्यक्त करणे व त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्यपालन त्यांच्या मृत्युपश्चात करणे ह्या हेतूने हा पितृपंधरवडा महत्वाचा मानला जातो. चला तर आजच्या पॉडकास्टमधून ह्याबद्दल काही जाणून घेऊया.

    संकल्पना व सहभाग -
    सौ. अपर्णा मोडक
    सौ. सरोज करमरकर
    वैद्या सौ. स्वाती कर्वे

    The period from Pratipada to Amavasya in Krushna Paksha (15 days of the month) month of Bhadrapada is known as Pitrupandharwada. Even though this is not a festival, this ritual is considered important for the purpose of expressing respect and goodwill towards our departed ancestors and fulfilling our duties towards them after their death. This is very important ritual as per our Hindu religion. Let's learn about it in today's podcast.

    Concept and Participation -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख होत जाते.. हा ६४ कलांचा बुद्धिदाता श्री गणपती आपल्याला अधिकाधिक जवळचा होतो. याच बाप्पाच्या आराधनेसाठी खास राखून ठेवलेले दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे दहा दिवस... या दहा दिवसात भारतात व भारताबाहेर अनेक ठिकाणी सर्वजण बाप्पाच्या श्रद्धापूर्वक पूजनामध्ये रंगून जातात... चला तर आपल्या ह्या आठवड्यातील दोन पाॅडकास्टच्या निमित्ताने गणेशोत्सवाबद्दल काही जाणून घेऊया...
    # गणपती बाप्पा मोरया #

    संकल्पना व सादरीकरण - (सृजनसख्या)
    अपर्णा मोडक
    सरोज करमरकर
    वैद्या स्वाती कर्वे

    Listeners, our beloved GanapatiBappa... In our childhood we are taught to bow to Bappa.. "Bappala Morya Kar"..This is our introduction to our beloved Bappa. We get to know a lot more about him at every stage of our life. He is the God of Wisdom, 64 Art forms..He is our beloved Ganapatibappa.

    The days specially reserved for worshiping him are the ten days from Bhadrapad Chaturthi to Anant Chaturdashi...In these ten days, many people from places in India as well as outside India, celebrate and enjoy devotional worship of Bappa... Let's learn something about Ganeshotsav on this occasion through next two podcasts this week. ..
    # Ganpati Bappa Morya #

    Concept and presentation - (Srujan Sakhya)
    Aparna Modak
    Saroj Karmarkar
    Dr. Swati Karve

  • आजचा आपला पॉडकास्ट हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येच्या दिवशी सादर करतोय. आजचे वैशिष्ट्य म्हणजे बैल पोळा. आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा खरा सोबती बैल.. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून..

    संकल्पना व सहभाग -
    सौ. अपर्णा मोडक
    सौ. सरोज करमरकर
    वैद्या सौ. स्वाती कर्वे

    Today's podcast is being presented on the last day of the month of Shravan i.e. on the day of Amavasya. Today's feature is Bulls. Bull is the true companion of the farmers who work in the fields for us all year round.. Let's express our gratitude to him through this podcast today..

    Concept and Participation -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • "तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा.. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा"... अशी गाणी आणि त्याबरोबर धमाल मस्तीत नाचणारी गोविंदा पथके... काय आला ना डोळ्यासमोर गोकुळाष्टमीचा उत्सव..आपल्या सगळ्यांचा जिवलग सखा कृष्ण.. चला तर या कृष्णाबद्दल थोडं मनातलं बोलूया- आजच्या आपल्या पाॅडकास्टच्या माध्यमातून "गोविंदा आला रे आला"

    संकल्पना व सहभाग -
    सौ. अपर्णा मोडक
    सौ. सरोज करमरकर
    वैद्या सौ. स्वाती कर्वे
    श्री. पुनीत करमरकर

    "Govinda re gopala, yashodechya tanhya bala, Govinda Re Gopala"... such songs and the Govinda troupe dancing along with them. An very enthusiastically celebrated festival is Gokulashtami festival.Its celebrated on the day of Shravan Ashtami which is lord krishna's birthday. Krishna is our dearest friend.. Let's talk heart to heart about Krishna - through our podcast "Govinda Aala Re Aala"

    Concept and Participation -
    Mrs. Aparna Modak
    Mrs. Saroj Karmarkar
    Vaidya Mrs. Swati Karve
    Mr. Puneet Karmarkar

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • Today is August 15, 2022. Amritmahotsav (75 years) of the Independence Day of our country India! Best wishes to all our listeners on India's 75th Independence Day... On this occasion we, Srujan Sakhya are presenting a POWADA. This veer Rasapurna Powada written by Shaheer Pralhad Rai which depicts the inspirational story of Rani Lakshmibai's struggle in 1857 !!!

    Presenting Srujan sakhya with Eplog Media... Today's Podcast "Vande Mataram"

    Concept and Writing -
    Mrs. Saroj Karmarkar
    Mrs. Aparna Modak
    Dr. Mrs. Swati Karve

    आज १५ ऑगस्ट २०२२. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव ! आपल्या सर्व श्रोत्यांना भारताच्या ७५व्या म्हणजेच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा... यानिमित्ताने आम्ही सृजन सख्या आज सादर करीत आहोत... राणी लक्ष्मीबाईंच्या १८५७ सालच्या लढ्याचे यथार्थ वर्णन करणारा शाहीर प्रल्हाद राय यांच्या लेखणीतून साकारलेला वीररसपूर्ण पोवाडा !!!

    सादर करतोय Eplog मीडियाबरोबर सृजनसख्या... आजचा पॉडकास्ट "वंदे मातरम्"

    संकल्पना -
    सौ.सरोज करमरकर
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या सौ स्वाती कर्वे

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • नागपंचमीनंतर सर्वांना वेध लागतात ते नारळीपौर्णिमेचे..कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यांची रोजीरोटी ज्यावर अवलंबून आहे, असा समुद्रदेव आणि त्याची अधिष्ठाती देवता वरूणराज याची पूजा करून कोळीबंधव हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. याच दिवशी राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा भावा-बहिणींमधील प्रेमाचा धागा घट्ट करणारा आणि त्यांच्यातील आपुलकी, मायेचा सण म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील महिला वर्गाचे आवडते मंगळागौरीचे व्रत व जिवतीपूजनाचीही माहिती घेऊया आमच्या आजच्या पाॅडकास्ट मधून
    " श्रावण आला.. सणांनी सजलेला, नटलेला".

    सादर करतोय Eplog मीडियाबरोबर सृजनसख्या...

    संकल्पना व लेखन -
    सौ.सरोज करमरकर
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या सौ स्वाती कर्वे

    After Nag Panchami everyone is interested in Narali Poornima..This is an important festival for the Koli brothers. Kolibandhav celebrate Naralipaurnima with great gaiety by worshiping the sea god and his presiding deity Varunaraja, on whom their livelihood depends. On this day, Rakhi Poornima i.e. Raksha Bandhan is celebrated as a festival to strengthen the thread of love between brothers and sisters. It helps to strengthen their affection and love. Along with this, let's also learn about Mangalagouri Vrat and Jivati ​​Pujan, the favorite of women in the month of Shravan, from our today's podcast.
    " Shravan ala, sananni natalela sajalela".

    Presenting Eplog Media's creation with...Srujan Sakhya

    Concept and Writing -
    Mrs. Saroj Karmarkar
    Mrs. Aparna Modak
    Dr. Mrs. Swati Karve

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • श्रोतेहो, श्रावण महिना सुरू झाला की सणांची मालिका सुरू होते, ती नागपंचमीपासून .....
    नागपंचमीच्या पूजनाचे महत्त्व, माहेरवाशिणींचं त्यानिमित्ताने माहेरी येणं, मैत्रिणींबरोबर सणाची मजा लुटणे, तसेच या सणाचा पर्यावरणाशी असलेला संबंध, या सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या ,
    पंचमीचा सण आला या पाॅडकास्ट मधून.... सादर करतोय Ep.Log media बरोबर सृजनसख्या...

    संकल्पना व लेखन
    सौ.सरोज करमरकर
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या सौ स्वाती कर्वे

    Welcome listeners to the festival of Panchami..Nag Panchami is celebrated in the month of Sravan. As Shravan begins, a series of festivals start and this is truly the Festival King.
    Today, let's take a look at the importance of Nagpanchami worship, Mahervashini's coming home on that occasion, enjoying the festival with friends, and also the relationship of this festival with the environment.
    Panchamicha san aala From this podcast....
    Presented by Srujan sakhya and Ep.Log Media

    Concept and writing
    Mrs. Saroj Karmarkar
    Mrs. Aparna Modak
    Dr. Swati Karve

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • The Deep (lamp)...It's a symbolic version of our energy source Suryadev(Sun). It's a true symbol of light, pure knowledge, energy, and liveliness.

    Our daily pooja or any of our auspicious occasions can't start without the ritual of lighting a lamp. It's the gratitude we offer to Agnidev.

    Deep comes in various forms like Diwa, Panati, samayee, niranjan and many more. It has very special importance in our Hindu culture.

    Today is आषाढ अमावस्या-- 'दिव्यांची आवस' which is specially celebrated for honoring this symbol of energy... Deep. This day is also known as गतहारी अमावस्या.

    Do listen to our podcast " Divya Divya Deepotkar " to know more about this Deeppujan and Gatahari Amavasya. Also understand the science and the importance of many leafy vegetables,(रानभाज्या) which are specially grown and consumed in the rainy season.

    So listeners...stay tuned with podcast 'utsavsananchamelsanskrutiparamparancha' with srujanskhya and Ep.Log Media.

    Presented by -
    Sau.Aparna Modak
    Sau. Saroj Karmarkar
    Vaidya Sau.Swati Karve

    हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे .रोजच्या पूजेत किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी, प्रथम दिव्याची पूजा करून सुरुवात केली जाते .
    या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन, ज्ञानाचा मंगलप्रकाश पसरू दे अशी दिव्याला प्रार्थना करतात. तसेच हा दिवस गताहारी अमावास्या म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल विशेष माहिती अवश्य ऐका.
    तसेच ह्यादिवसात उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि माहिती याबद्दलही काही खास जाणून घ्या.

    या मालिकेद्वारे आपल्या हिंदू सण समारंभाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवतो. अभिवाचन ,गोष्टी ,विवेचन, लोकगीत गायन, गजर, भजन-कीर्तन या सर्व कला प्रकारांनी ही माहिती रंजक पद्धतीने तुमच्यासमोर सादर करणे हा आमचा मानस.
    आतापर्यंत चैत्र आणि वैशाख महीन्यात आपले पाच podcast रिलीज झाले. या महिन्याचा पाॅडकास्ट आम्ही आज म्हणजेच 28 जुलै रोजी आषाढ अमावास्या म्हणजेच दिव्याच्या अमावस्येच्या निमित्ताने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.

    आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
    अंतर्गत,
    दिव्या दिव्या दीपोत्कार
    हा भाग नक्की ऐका, like करा, शेअर करा..

    😊 धन्यवाद...🙏

    संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे...

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • "Guruvin nahi duja aadhar - Our greatest piller is our Teacher" A special podcast on the occasion of Gurupournima..

    Today is the auspicous occassion of Gurupournima ..also known as Vyaspournima. This is the day to worship our greatest Hindu guru Maharshi Vyas. The day of Gurupournima is also to express our gratitude for every Guru qho enriches our life..

    Through our today's podcast "Guruvin Nahi Duja Aadhar-Our greatest piller is our Teacher" we would get to know something special about Guru Purnima as well as every direct and indirect Gurus who help us in different stages of our lives.
    So do listen to the podcast !!

    Presented by -
    Srujan Sakhya
    Sau. Saroj karmarkar
    Vaidya Sau. Swati Karve
    Sau. Aparna Modak

    आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा.. अर्थात व्यासपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मातील महान गुरु महर्षी व्यास यांचे पूजन करण्याचा हा शुभदिवस. त्याचप्रमाणे आपले जीवन समृद्ध करणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस... "गुरुविण नाही दुजा आधार" या आमच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेबद्दल आणि आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष गुरूंबद्दल काही खास... नक्की ऐका "गुरुविण नाही दुजा आधार"

    सादरकर्त्या -
    सृजनसख्या
    सौ. सरोज करमरकर
    वैद्य सौ. स्वाती कर्वे
    सौ. अपर्णा मोडक

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • Namskar Mauli, Today is the auspicious day, Ashadi Ekadashi... It is a very important day all over Maharashtra. There is an old tradition of Ashadhwari of Pandharpur on this day. We get a wonderful and lively experience from the Vitthal devotion of Warakaris.
    'Kirtan' is one of the nine forms of devotion (Bhakti).
    We have a tradition of performing kirtan on various religious festivals like Ashadi Ekadashi, Karthiki Ekadashi, Ramjanma, Gokulashtami.

    The foundation of Bhagwat Dharma has been laid by many saints including Saint Dnyaneshwar through this 'Kirtan bhakti'.

    The purpose of kirtan is not only devotion to God but also social enlightenment, spiritual upliftment, and showing the right direction to society.
    Even during the period of foreign invasions, many kirtankars did the work of public awareness and enlightened them with the ideas of patriotism.

    So let's get engrossed and join us in this mesmerizing podcast - ' Kirtanrang '

    *kirtankar - Dr. Swati Karve,
    *Tabla - Atharva Karve
    *Harmonium - Viraj Modak

    मंडळी, आज आहे आषाढी एकादशी...संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस.. कारण आपल्याकडे पंढरपूरच्या आषाढी वारीची खूप मोठी परंपरा आहे.. भक्तीमार्गाचा एक विलक्षण चैतन्यदायी अनुभव आपल्याला वारकऱ्यांच्या ह्या विठ्ठल भक्तीतून मिळतो.
    श्रोतेहो नवविधा भक्तीतील एक प्रकार म्हणजे कीर्तन.
    आपल्याकडे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, रामजन्म, गोकुळाष्टमी अशा वेगवेगळ्या धार्मिक सणांना, किर्तन आणि प्रवचन करण्याची परंपरा आहे..
    भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांसह अनेक संत मंडळींनी रचला तो ह्या कीर्तन भक्तीद्वारेच.
    कीर्तन म्हणजे फक्त ईश्वर भक्ती नव्हे तर त्याचबरोबर समाजप्रबोधन, आध्यात्मिक उन्नती, समाजाला योग्य दिशा दाखवणे हा सुद्धा कीर्तनाचा उद्देश असतो.
    आतापर्यंतच्या अनेक परकीय आक्रमणाच्या काळातही समाजप्रबोधनाचे, लोकजागृतीचे कार्य कित्येक कीर्तनकारांनी केले आहे.
    चला तर आज आपण आपल्या "उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा" या पोडकास्ट मालिकेअंतर्गत सादर होणाऱ्या कीर्तनरंगात रंगून जाऊया.

    सृजन सख्या निर्मिती -
    कीर्तनकार - वैद्या सौ. स्वाती कर्वे
    तबला - चि. अथर्व कर्वे संवादिनी - चि. विराज मोडक

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • योगशास्त्राची गुरुकिल्ली - मुलाखत- सौ नंदिनी गोरे (योगशिक्षक, तत्वज्ञान अभ्यासक, मानसतज्ञ) आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून असलेली योगविद्या महर्षी पतंजलींनी सूत्रबद्ध करून आपल्या सामान्य जनांसाठी हे ज्ञानाचे भांडार खुले केले. आपल्या रोजच्या आयुष्यातील योगशास्त्राचे महत्त्व तसेच जर आपण योगशास्त्र हे फक्त योगासनांपुरते मर्यादित न ठेवता ती एक जीवनशैली म्हणून अंगीकारू शकलो, तर आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक आरोग्य सुदृढ होऊ शकते.. हाच संदेश ' योगशास्त्राची गुरुकिल्ली ' च्या माध्यमातून सौ. नंदिनी गोरे आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत. तेव्हा ऐकायला विसरू नका... 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने "उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा" या पॉडकास्ट मालिकेतील आज सादर होणारा पाॅडकास्ट ...

    We present to you an Interview by Mrs. Nandini Gore who is renowned Yog trainer, Counseling psychologist, and Philosophy student.

    She will be sharing the importance of Yogshastra in our day-to-day life.

    From ancient times, the science behind Yogashastra has flourished in our Hindu culture (Sanskriti). This knowledge has been categorized into different principles by Maharshi Patanjali. This made it easier for the common man to learn the basics of Yogshastra and helped him in enhancing his lifestyle.

    If we learn these basics of Yogshastra and implement them as our daily lifestyle..they would prove to be the key to a healthy lifestyle and would be a boon for our Physical, Mental, Intellectual, and Spiritual progress.

    Mrs. Nandini Gore will be guiding us to this ' key to Yogshastra ' in today's interview.

    So don't forget to hear our special podcast on International Yog Day, 21st June.

    You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

    For advertising/partnerships send you can send us an email at [email protected].

    If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

    See omnystudio.com/listener for privacy information.

  • नमस्कार ...!
    आम्ही सृजनसख्या Ep log मीडियाच्या संयुक्त विद्यमाने वर नमूद केलेल्या विषयावरील  पाॅडकास्ट खास आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत.

    "आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण पृथ्वी ग्रहावर राहू शकतो. निसर्ग आपल्याला संदेश देतोय की "स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेच आहे" 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहीलेले हे वाक्य आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवणं फार गरजेच आहे. अशा पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पना आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने सांगितलेल्या आहेत, त्यापैकीच एक सण म्हणजे वटपौर्णिमा ... सर्वात जास्त प्राणवायू देणारा वटवृक्ष.. त्याच्या सानिध्यात करायची पूजा हीच वटपौर्णिमा. याबद्दलही काही खास जाणून घेऊया. त्याचप्रमाणे भारत वर्षाला लाभलेली २ शक्तीची प्रतीके... राणी लक्ष्मीबाई व छत्रपती शिवाजी महाराज. यातील राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी व शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन हेही या ज्येष्ठ महिन्यातच आहेत. त्यानिमित्ताने त्यांचेही पुण्यस्मरण करूया आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकातील शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाचे अभिवाचन ऐकुया आणि मंत्रमुग्ध होऊया...

    या मालिकेद्वारे आपल्या हिंदू सण समारंभाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवतो. अभिवाचन ,गोष्टी ,विवेचन, लोकगीत गायन, गजर, भजन-कीर्तन या सर्व कला प्रकारांनी ही माहिती रंजक पद्धतीने तुमच्यासमोर सादर करणे हा आमचा मानस. 
    आतापर्यंत चैत्र आणि वैशाख महीन्यात आपले पाच podcast रिलीज झाले. ज्येष्ठ महिन्याचा पाॅडकास्ट आम्ही आज म्हणजेच १४ जून या वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. 

     आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
    अंतर्गत भाग- जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे,
    स्मरण करूया थोर लढवय्यांचे
    हा भाग नक्की ऐका, like करा, शेअर करा..

    आम्ही सृजन सख्या,  आपल्या संस्कृती आणि परंपरांचा योग्य तो मान राखून, मनोरंजन आणि प्रबोधन होईल असे दर्जेदार  कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करीत आहे.
    विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्ही सृजन सख्या, सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा. मंगळागौर, वाढदिवस, डोहाळेजेवण, बारसे, मुंज, विवाह अशासारख्या अगदी कौटुंबिक कार्यक्रमांपासून ते मोठमोठ्या संस्था आणि सोसायटीच्या स्नेहसंमेलनांपर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही सादर करतो. कार्यक्रमामध्ये सर्वसमावेशक खेळ किंवा इतर माध्यमातून प्रेक्षकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्यासारख्या रसिकांना आमचे हे कार्यक्रम आवडतात, त्यांची दाद आम्हाला नेहमीच मिळते, त्यामुळे अधिकाधिक चांगले काम करत रहाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

    Eplog Media ह्या मिडीया कंपनीद्वारे आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या जसे लेखक, कवी, दिग्दर्शक, अ‍ॅक्टर्स, डॉक्टर्स.. खरंतर सगळ्याच कलाक्षेत्रातील प्रथितयश कलाकारांच्या वेगवेगळ्या पाॅडकास्ट मालिका हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतून आपल्यासमोर आणल्या आहेत. उत्तमोत्तम साहित्य सर्व लोकांपर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न Eplog Media गेले पाचसहा वर्ष करत आहेत आणि जगभरात सर्व कानाकोपऱ्यांपर्यंत पोचून त्यांनी सर्व प्रेक्षकांचे दर्जेदार   podcast कार्यक्रमांद्वारे  मनोरंजन केले आहे. 
    'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' ह्या खास पॉडकास्टच्या निमित्ताने 'सृजन सख्या' व Eplog मीडिया एकत्र येऊन तुमच्यासाठी ही सण-उत्सवांची मालिका घेऊन आले आहेत..चला तर आमच्याबरोबर ह्या सणांच्या वारीत सहभागी व्हा. त्यासाठी Eplog मीडियाच्या वेब पेजवर जा किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट चॅनलला...आमचा हा podcast नक्की ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ...