Folgen
-
या जीवघेण्या आजाराला आम्ही निकराने तोंड देत यशस्वी झालो. आमच्या ’यशवंत’ बंगल्यात आमचा सुखी संसार पुन्हा सुरु झाला. माझ्या यशस्वी अनुभवाचा उपयोग हेच या कथनाचं श्रेय आहे.
In the face of all the ailments, we emerged victorious. Our beloved bungalow “Yashwant” now stands true to its name, as we have returned to our blissful life. Hope my success story stands as a tale of triumph for the rest of the world. -
आता पुण्याला जाण्याचे वेध लागले होते. आम्ही छान गप्पा मारत हॉलमध्ये बसलो असतानाच आत धडपडल्याचा आवाज आला, पाठोपाठ विलासची किंकाळी माझ्या कानावर पडली. एका अडचणीतून मार्ग काढावा तर दुसरी समोर येत होती...
We longed to go back to Pune. The entire family had gathered in the living room, enjoying the warmth of happy conversations after a long time. When suddenly, Vilas’s agonising scream was heard. As we gathered our withered minds out of one storm, we were caught in another one. -
Fehlende Folgen?
-
विलासलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळताच मन आनंदून गेलं. ही सर्व कहाणी त्याच्या नजरेने जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली...संकटांच्या काळ्या ढगाला प्रेम आणि श्रद्धेची - रुपेरी किनार!
I was thrilled to hear about Vilas getting a discharge. The time has come to give him a listening ear and understand his side of this appalling journey. The silver lining of hope and love now glistened with grace. -
मला रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं. विलासचीही प्रगती चांगली चालू होती. मला डिस्चार्जही मिळाला. मात्र आम्हा दोघांच्या मनाला उभारी एकाच गोष्टीने येणार होती - एकमेकांची भेट होणं! विलासला पाहून १० दिवस उलटून गेल्यावर एक दिवस अचानक संधी आली...
I was shifted to the hospital room. Vilas’s condition was steadily improving. Soon, I was discharged. However, a journey without his company felt incomplete. At last, after 10 days of being apart, we met! -
ऑपरेशनचा दिवस उजाडला. अॅनेस्थेशिया देण्यापूर्वी मी माझ्या देवांना हाक मारली. माझ्या शंकराचा चेहरा संपूर्ण खोलीभर पसरला. माझी शुद्ध केव्हा हरपली मला कळलंच नाही.
It was the day of the operation. Before entering the operation theatre, I made a quick prayer to the almighty. As the anaesthesia began seeping into the body, I could feel the divine positivity fill the room. -
विलासची स्थिती अशी होती की एका दिवसाचा उशीरही त्याच्या जीवावर उठला असता. मी नव्याने टेस्ट द्यायला एकीकडे, दुसरीकडे तापाने क्षीण झालेला विलास अशी आमची अवस्था होती. मात्र हळूहळू चमत्कार घडायला सुरुवात झाली...
Vilas’s health had completely deteriorated. A day's delay would have proved fatal. Like a fragile thread being tugged on either end, Vilas and I were being tested by the difficulties of physical ailments and practical issues respectively. However, around the dark clouds of despair, a silver lining soon began to appear. -
मी पुन्हा एकदा लीगल कमिटीसमोर हजर झाले. आता केवळ दोन दिवस उरले होते. रविवार आणि सोमवार सुरळीत पार पडले की मंगळवारी ऑपरेशन! आमचं ध्येय जवळ येत चाललं होतं.
It was time to have a discussion with the legal committee once again. Only two more days to the operation. We were nearing the end of this frustrating wait -
बंद जागांची भीती असताना मी पुढच्या टेस्ट कश्या करणार होते कोणालाच अंदाज येत नव्हता. टेस्ट सुरु झाली, मी हळूहळू त्या भुयारात जाऊ लागताच जोरजोरात रडू लागले. माझं घाबरणं माझ्या संपूर्ण कुटुंबाला घातक ठरणार होतं. मला स्वतःला सावरणं भाग होतं.
Being claustrophobic, performing further tests was a huge challenge for me. As I entered through the cramped dome of the MRI machine, I began to cry loudly. I couldn’t let my weakness shatter my family’s spirit. I have to remain strong… -
विलासला भेटायला आमची नात - महिका आली आणि वातावरण आनंदाने भरुन गेलं. त्याची एबीजी टेस्ट अगदी काळजीपूर्वक करण्यात आली. विलास वेदना लपवण्याचा प्रयत्न करत होता पण आदित्यचे भरलेले डोळे पाहून सगळं कळून येत होतं.
Our dearest granddaughter Mahika, came to visit Vilas and enlightened our gloomy world with her adorable smile. Vilas’s ABC test was successfully conducted with care. Vilas’s urge to subdue his pain was clearly expressed through Aditya’s tearful eyes. -
सर्वेशचे रिपोर्ट्स बघून डॉक्टर अचानक खाली बसले. त्यांचा चेहरा उतरला आणि ते म्हणाले, "सर्वेश यू कॅनॉट बी अ डोनर"
माझी डोनर होण्याची इच्छा देव पूर्ण करत असला तरी त्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललं जात होतं. विलासला डोळ्यात तेल घालून जपावं लागणार होतं...
After having a keen look at Sarvesh’s reports, the doctor declared him ineligible as a donor. While this increased my chances of being a donor, it also increased the waiting time for the surgery. It was time to pull up our socks and take better care of Vilas’s well-being. -
विलासला घाईनेच अॅडमिट केलं, त्याचा असायटीस वाढत चालला होता. सर्वेशच्या डोनर होण्याबाबत लीगल कमिटीने माझीही उलटतपासणी घेतली. एक महिला सभासद म्हणाली, कोणती आई आपल्या नवर्याचा जीव वाचवण्यासाठी मुलाचा जीव पणाला लावते? मी सर्द झाले. याला उत्तर देण्याची माझी तयारी नव्हती.
Looking at the increased growth of ascites in Vilas’s body, he was immediately admitted to the hospital. Meanwhile, I was stuck in the labyrinth of moral debates with the legal committee, over Sarvesh being the donor. Amidst the discussion, I was left aghast after being questioned about my maternal integrity. What kind of mother puts her own son's life at a risk for her husband? Words that made my feet go numb. -
दिल्लीला निघण्याची तयारी झाली. सर गंगाराम हॉस्पिटल अद्ययावत असल्याने काळजी नव्हती. सर्वजण सकारात्मक राहाण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते मात्र ऑपरेशनपूर्वी ज्या टेस्ट कराव्या लागणार होत्या त्याची यादी पाहाताच माझ्या काळजात धडकी भरली...
We were ready to leave for Delhi. Here, the state-of-the-art health infrastructure at Sir. Ganagaram Hospital was the only matter of solace. While everyone was trying to keep a strong face, my heart was gripped with fear by the lengthy list of tests to be completed before the surgery. -
हैदराबादला जाऊन आल्यापासून घटनांनी वेग घेतला. ऑपरेशन करायचे यावर शिक्कामोर्तब होताच एक यक्षप्रश्न उभा राहिला. डोनर कोण होणार?
The real struggle began shortly after returning from Hyderabad. Having finalised the decision of surgery, we were faced with a more perplexing question. Who will be the donor? -
लिव्हर ट्रान्सप्लांटला पर्याय नाही हे स्पष्टपणे दिसू लागलं होतं. ऑपरेशन करावं लागू नये म्हणून इच्छा धरणारी मी, आता उलट दिशेने शक्ती लावू लागले होते. काहीही करुन विलास बरा झाला पाहिजे हे एकच ध्येय समोर होते.
It was certain that “Liver transplant” is the only answer! My quiet desire of not wanting to operate was replaced by the courage to opt for it. After all, Vilas’s health was all that mattered. -
लिव्हरचं दुखणं आता विविधप्रकारे आपलं अस्तित्व जाणवून देऊ लागलं. मिळेल त्या पर्यायाचा शोध सुरु झाला.
नवसाचे उपाय आणि विज्ञान यांच्यातल्या कशाचं पारडं जड होणार हे केवळ काळच ठरवणार होता...
Liver pain started emerging and slowly began gaining strength. All of us were in desperate search of a solution. What could weigh more, science or spirituality, only time could tell… -
प्रत्येकाला शरीरशास्त्राची माहिती असतेच पण त्याचं महत्त्व समजून घेण्याची वेळ फार कमी जणांच्या नशिबी येते. अगदी दृष्ट लागावी इतक्या सुखात सारं कुटुंब एकत्र असतानाच २००५ साली विलास आजारी असल्याची लक्षणं दिसू लागली. सुखी संसारावर काळे ढग घोंगावू लागले...
While one understands what human anatomy means, the opportunity to truly understand its importance occurs rarely. We were all living a peaceful life when in 2005, my husband Vilas's health began to deteriorate. Our sunny days were eclipsed by the dark clouds of fate…